मोठी बातमी! बदलापूर लैगिंक अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, धक्कादायक माहिती आली समोर…

बदलापूर : बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या तसेच सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. बदलापूरमधील एका शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे दृष्कृत्य केलं आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अक्षय शिंदे हा पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पोलिसांनी संरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याचंही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून त्याने तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या. यामध्ये त्याचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, अक्षय शिंदेची आत्महत्या नसून पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचे समोर आले आहे.
अक्षय शिंदे याला पोलीस कोठडीत घेऊन जाण्यात येत होते. त्यावेळी त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करताना एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. यानंतर संरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला आहे.