Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी!! देवेंद्र फडणवीसांच्या हातात बंदूक अन् ‘बदला पुरा’ चा उल्लेख…

Akshay Shinde Encounter : महिन्याभरापूर्वी बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी असलेला शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली.

आरोपी अक्षय शिंदे हा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपासवर झालेल्या पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला.
राज्यात सध्या या प्रकरणावर वातावरणं चांगलचं तापलं आहे. अत्याचाराच्या घटनेतील आरोपी मेल्याने सर्वसामान्य नागरिक आनंद व्यक्त करत असतानाच विरोधकांनी मात्र या प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनरवॉर रंगलं आहे.“महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार, असा उल्लेख बॅनरवर असून त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही झळकतोय. Akshay Shinde Encounter
एवढंच नव्हे तर या बॅनर्समधून मविआला देखील डिवचण्यात आले असून ‘पोलिसांकडून वसूली करणार सरकार’ असाही उल्लेख काही बॅनर्सवर आहे. यामुळे आता नवा वाद सुरू पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.
मुंबईतील अनेक भागात हे बॅनर्स सध्या झळकत आहेत. ‘बदला पुरा’, “महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार” असा आशय असलेले अनेक बॅनर्स सध्या शहरात दिसत असून वांद्रे येथील कलानगरमध्येही ते झळकत आहेत.
या बॅनर्सवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत असून त्यांच्या हातात बंदूकही आहे. तसेच “अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस कोण? एंकाऊंटर फेम प्रदिप शर्माबरोबर केले होते काम” असा आशय असलेले हे निनावी बॅनर्स चर्चेचा विषय छरे आहेत.
दरम्यान, या बॅनर्समधून फक्त देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलेले नाही तर महाविकास आघाडीला देखील डिवचण्यात आलं आहे. गोरेगाव येथे लावण्यात आलेल्या काही बॅनरवरून तर मविआवर टीका करण्यात आली आहे. ‘मविआच्या काळात पोलीस सरकारसाठी वसूली करायचे, पण महायुतीच्या काळात पोलीस सरकारसाठी हिशोब करणार’ अशा आशयाचे बॅनर्स लागले आहेत.