अक्षय शिंदेने बलात्कार केलाचं नाही, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा, म्हणाले, चहावाल्याने..

मुंबई : बदलापूर येथील दोन शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा इनकाऊंटरमध्ये मृत्यू झाला, मात्र, हा एनकाऊंटर फेक असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला.

यावरुन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, बलात्काऱ्यांना सोडवण्यासाठी त्याची हत्या केली असा असा दावा आव्हाडांनी केला आहे. आज मुंबईत संतोष देशमुख प्रकरणी सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, अक्षय शिंदेला ज्या अंतरावरुन गोळी मारली ते अंतर अतिशय हास्यस्पपद आहे. त्याच्या हाताला बेड्या होत्या मग तो कसा आणि कोणाच्या खिशातून रिव्हॉल्व्हर काढणार? आता तर हे पण सिद्ध झाले की रिव्हॉल्वहरवर अक्षय शिंदेंच्या हाताचे निशाणच नाहीत.

अक्षय शिंदेने तो बलात्कार केलेलाच नाही. ज्यांनी बलात्कार केला त्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली आहे. अक्षय शिंदे मेल्यावर ते अचानक कसे हजर होतात. यातील मोठी गोष्ट म्हणजे माणसाची मेमरी शॉर्ट आहे. विसरून जातील. या एकाच गेमवर लोक खेळतात.
त्याला मारलं तो माझा मतदार संघ आहे. तिथे चहावाला आहे. त्याने मला सांगितलं काही तरी लफडा झाला. फायरिंग झाली. लगेच दुपारी अक्षय शिंदेचं प्रकरण समोर आलं, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, न्यायाधिशांनी सांगलंल अक्षय शिंदेचे हे एन्काऊंटर नाही. मर्डर आहे. अक्षय शिंदे प्रकरणात अजूनपर्यंत गुन्हा दाखल नाही . ज्येष्ठ पोलीस अधिकारी पोलीस व्हॅनमध्ये जाऊन बसतो. मुंबईचे पोलीस काय करू शकतात हे दाऊदला माहीत आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.