अक्कलकोटमधील हल्ल्या प्रकरण तापले, संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांना शरद पवारांचा फोन, म्हणाले…


सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आल्याने काल राज्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली.

याबाबत सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. शाई लावणारे भाजपचे पदाधिकारी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आता शरद पवार यांनी लक्ष घातले असून त्यांनी प्रवीण गायकवाड यांना फोन लावून माहिती घेतली आहे.

शरद पवार यांनी प्रविण गायकवाड यांच्याकडून हल्ल्याबद्दलची माहिती जाणून घेतली. हल्ला करणारे कार्यकर्ते कोण होते? कुठून आले होते? तुम्हाला मारहाण झाली का, घटनास्थळी पोलीस होते का? असे प्रश्न शरद पवार यांनी गायकवाडांना विचारले. गायकवाड यांनी ही सगळी माहिती शरद पवारांना सांगितली.

येथील शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांकडून हे काळं फासण्यात आलं आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ही घटना घडली.

प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर होते. यावेळी ते फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आले होते. तिथे येताच काही लोक अचानकपणे त्यांच्याकडे आले आणि जमा होत त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं. काळं फासणारे लोक हे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत.

याबाबत काहींना अटक केली आहे. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचादेखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता.

यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणदेखील केले होते. अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याची माहिती असून पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!