अजितदादा तुम्ही एवढ्या चुका केल्यात मग सांगा कधी खुर्ची खाली करता? राजू शेट्टींनी सगळंच सांगितलं…


कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. काल अजित पवार यांनी चुका टाळा नाहीतर खुर्ची खाली करा, असा इशारा आपल्याच मंत्र्यांना दिला आहे.

यावरून राजू शेट्टी यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, अजितदादा तुम्ही एवढ्या चुका केल्यात मग सांगा कधी खुर्ची खाली करता? आपल्यामुळेच बेकायदेशीर रित्या एक रक्कमी एफ. आर. पी. मध्ये मोडतोड करण्यात आली. आपल्यामुळेच स्वत:च्या स्वार्थासाठी चुकीचे साखर उद्योगाची धोरणे राबविली जात आहेत.

असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच ते म्हणाले, आपण राज्याचे वित्तमंत्री आहात, तिजोरीत पैसा नसतानाही विकास कामांना मंजूरी देत आहात. सदर कामे पुर्ण होवून तीन -तीन वर्षे झाले तरीही ठेकेदारांना बिले मिळत नाहीत. यामुळे आता ठेकेदारही आत्महत्या करू लागले आहेत.

या केलेल्या चुकीची नैतिक जबाबदारी तुम्ही स्विकारणार का? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. तुमच्याच आर्थिक नियोजनाच्या चुकामुळे राज्यातील कंत्राटी कामगारांना सहा -सहा महिने पगार मिळेनात. तुम्ही केलेल्या चुकामुळेच रोजगार हमीच्या कामावरील मजूरांचे पैसे मिळेनात.

तुम्हीच केलेल्या चुकामुळे सरकारला महसूल वाढवण्यासाठी मद्य धोरण बदलून, नियम व अटी शिथील करून नवीन मद्य परवाने देवून राज्याच्या तिजोरीत कर वाढविण्यासाठी तरूण पिढी व्यसनाधीन करत आहात. असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

तसेच ते म्हणाले, तुम्हीच केलेल्या चुकीमुळे अतिवृष्टी व महापुराचे पंचनामे होवूनही शेतक-यांना मदत देता येईना. तीन वर्षे झाले पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलतीचे पैसा का देता आले नाहीत. यासह अशा अनेक चुका तुम्ही केलेल्या आहात व करत आहात, तर मग तुम्ही कधी खुर्ची खाली करणार? ते सांगा, असेही ते म्हणाले. यामुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!