अजितदादा भाजपच्या ‘त्या’ फाईलबाबत बोलले अन् 10 दिवसात अपघात झाला, राजकारणात खळबळ उडवणारी माहिती समोर…


मुंबई : मुंबईहून बारामतीला अजित पवार निघाले असता बारामती विमानतळाच्या शेजारी त्यांच्या विमानाची मोठा अपघात झाला. सुरूवाला सांगितले गेले की, अजित पवार या अपघातात गंभीर जखमी झाले. मात्र, त्यानंतर थेट अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी आली. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

अजित पवार यांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मोठी शंका उपस्थित केलीय. विमान अपघातावेळी ‘तिथं धुकं नव्हतं तर धोका होता’, त्यामुळं अजित दादांचा १०० टक्के घात झाल्याचे ते म्हणाले. आता यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून गंभीर शंका उपस्थित केली आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केली. पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल झाल्याचा दावा केला. मात्र त्यानंतर काही वेळात त्यांनी आपल्या वक्तव्यावरील यु-टर्न घेतला.

याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अजित दादांचा पक्ष हा आता पवार, पाटलांचा पक्ष राहिलेला नाही. तो आता गोयल, पटेल, पारेख, शाह, मोदी यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा पक्ष हा अस्सल मराठमोळ्या चेहरांचा पक्ष होता. सुरुवातीला अजितदादांचा पक्ष हा शाहांचा पक्ष होता. आता तो पटेल यांचा पक्ष होईल आणि महाराष्ट्रातील एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षाने गिळून टाकला आहे.

अजित पवार यांनी कधीही भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर काम केले नाही. सत्तेसाठी ते एकत्र आले. त्यांच्यावर भाजपने काही संकटं लादली. घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी, सीबीआय मागे लावले. त्यामुळे इतर राजकारणी जसे करतात तसेच त्यांनी केले. तेवढ्यापुरतेच अजितदादा भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाले. आपल्या वरच्या फाईल क्लिअर करून घेतल्या. त्यानंतर ते पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी धडपड करत होते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!