अजितदादा तुमच्यात धमक असेल तर….!!! संभाजीराजे यांचा थेट इशारा, बीडमध्ये वातावरण तापलं


बीड : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीड शहरात सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी मोर्चाद्वारे केली आहे. या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि देशमुख यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

यावेळी संभाजीराजे यांनी अजित पवारांवर निशाना साधला आहे. संभाजीराजे म्हणाले, अजितदादा तुम्ही प्रकटपणाने बोलला असाल माझी काम करण्याची पद्धत ही आहे. तुम्ही आता काम करून दाखवा. तुमची हिंमत असेल. तुमच्या धमक असेल तर आता काम करून दाखवा.

एक एक वार केलेत. भयंकर वार केलेत. फुले, आंबेडकर यांचं नाव घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? असा सवाल संभाजी राजे यांनी विचारला. तसेच यावेळी ते म्हणाले, धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं तर मी पालकत्व घेणार. आम्हाला दहशत चालत नाही. कुणी दहशत करत असेल तर मी या ठिकाणी येणार.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा खून करण्यात आल्याचे त्यांना फोनद्वारे कळवण्यात आले. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्याचेही स्पष्ट केले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे सरकारवर दबाव वाढला आहे. मोर्चाला दिग्गज नेत्यांचा पाठिंबा संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोजित या मोर्चात अनेकजण सहभागी झाले होते.

यावेळी छत्रपती संभाजी राजे भोसले, सुरेश धस, बजरंग सोनवणे, मनोज जरांगे आणि जितेंद्र आव्हाड यांसारखे अनेक नेते सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे मोर्चाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे वातावरण तापलं आहे.

यावेळी संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, असे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच, वाल्मिक कराड फरार असून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group