अजितदादा, भरणे व्यासपीठावर अन् सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील प्रेक्षकांमध्ये, इंदापूरमध्ये राजकीय कुरघोडी? नेमकं काय घडलं?


इंदापूर : इंदापूरमध्ये आज आयोजित अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना प्रेक्षकांमध्ये बसावे लागले. यामुळे त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज सुप्रिया सुळे आणि अजित दादा एका व्यासपीठावर येणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

असे असताना मात्र या कार्यक्रमात अजित पवार आणि आमदार दत्तात्रय भरणे यांना स्टेजवर जागा होती. मात्र खासदार सुप्रिया सुळे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना प्रेक्षकांच्या बसवावे लागले. यामुळे नाराजीचा सूर उमटला आहे.

या उद्घाटन कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी देखील या कामासाठी प्रयत्न केले असल्याचे अनेक वक्त्यांनी सांगितले. यामुळे त्यांना स्टेजवर जागा मिळावी अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र तसे घडले नाही. यामुळे याकडे उपस्थित सर्वांचे लक्ष लागले होते.

सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील यांनी प्रेक्षकांमध्येच बसून कार्यक्रम सुरळीत पार पाडला. मात्र घडलेल्या प्रकारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत बोलणे देखील टाळले आहे. यामुळे दोघांच्यात सुसंवाद नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आली आहे. या मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत.

पण त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. त्याबद्दल त्यांनी नाराजी बोलून दाखवली. सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत, तरीही त्यांच्या नावाचं निमंत्रण या कार्यक्रमात नव्हतं, यामुळे येणाऱ्या काळात याबाबत काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचा देखील संवाद झाल्याचं दिसून आलं, पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भाऊ-बहिणीतील संवाद झाला नाही. यामुळे याचीच चर्चा यावेळी या कार्यक्रमात झाली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!