शरद पवार यांच्याबाबत त्या टिकेला अजित पवारांचा पाठिंबा.? शरद पवारांबाबतचे ते मत सारखेच…


मुंबई : सध्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर नेते एकमेकांवर टीका करत आहेत. यामुळे याकडे लक्ष लागले आहे. आता मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत.

असे असताना आता आदरणीय शरद पवार साहेबांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठिंबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत आहे, असे म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट दिलीप वळसे पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे.

काल वळसे पाटील यांनी मंचर येथील एका मेळाव्यात बोलताना, शरद पवार यांना आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही, असा दावा केला होता. वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच पवार यांच्यावर टीका केली आहे.

आपल्याकडे शरद पवार यांच्यासारखे उत्तुंग नेते असताना फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात, नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते. देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही.

पण, महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या, असे ते म्हणाले होते.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीतील शरद पवार गट आक्रमक झाला आहे. त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येत आहे. शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी वळसे पाटील यांना कृतघ्न म्हंटले होते.

कार्यकर्त्यांनी वळसे पाटलांच्या विरोधात आंदोलन केले. या टिकेनंतर आज ट्विटरच्या माध्यमातून वळसे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हंटले. मात्र यानंतरही आता अजित पवार यांचा गट वळसे पाटील यांच्या पाठिशी उभा राहिला आहे.

अजित पवार गटाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच ट्विटर नवीन अधिकृत अकाऊंट उघडण्यात आले आहे. त्यावरुन, नामदार दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!