रात्री अचानक अजित पवारांची भेट, धनंजय मुंडेंवर कारवाई कधी? दादांनी स्पष्ठच सांगितलं…

मुंबई : धनंजय मुंडेंवरचे आरोप जोपर्यंत सिद्ध होणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याचीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली असून दोषी नाही तर कारवाई नाही, असं म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं समजत आहे.
काल धनंजय मुंडे, प्रपुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यासोबत अजित पवारांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अजित पवार हे मुडेंबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आपली भूमिका धनंजय मुंडे यांच्यासमोर मांडल्याची माहिती देखील मिळत आहे.
दरम्यान, काल रात्री देवगिरीवर धनंजय मुंडे दाखल झाले, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख नेतेही उपस्थित होते. या बैठकीत अजित पवारांनी थेट रोखठोक भूमिका मांडली. जोपर्यंत धनंजय मुंडे हे दोषी आढळत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर पक्षाकडून कोणतीच कारवाई करण्यात येणार नाही. पक्ष कारवाई करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंवर संतोष देशमुख प्रकरण, वाल्मिक कराडशी असणारे आर्थिक हितसंबंध, कृषीघोटाळ्यावरून आरोप होत आहेत. धनंजय मुंडेंचा राजिनामा घ्यावा असा दबाव वाढत असताना दुसरीकडे करुणा मुंडेंनी ओढलेले ताशेरे आणि वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे.
या अनुषंगाने गुरुवारी रात्री देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन तास चर्चा केली. या चर्चदरम्यान धनंजय मुंडेंवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्ष कोणतीही कारवाई करणार नसल्याची भूमिका घेत पुन्हा एकदा अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.