‘मी अजून दारूला स्पर्शही…! अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले, पहिल्या धारेची किक अन्…
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ यांच्या वतीनं ६३ व्या द्राक्ष परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. मी अजून दारूला स्पर्शही केलेला नाही, असे अजित पवार म्हणाले अन् एकच हशा पिकला.
दरम्यान या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ पुणे द्राक्ष परिषद अंतर्गत ६३ व्या वार्षिक मेळाव्याच्या उद्घाटनाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता अजित पवार याच्या भाषणाने झाली.
काहीजणांना एक वाइन पिली की किक बसते तर काहीजणांना पूर्ण खंबा मारला तरी किक बसत नाही, कोणाला पहिल्या धारेची पचते, तर कोणाला अख्खा खंबा ही पचतो.
तर कोणाकोणाला तर एखाद्या घोट पण भारी पडतो. परंतु , सुदैवाने मी अजून दारूला स्पर्श देखील केलेला नाही, असे गुपितच अजित पवार यांनी भर सभेत सांगितले. त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.
देशी दारूच्या दुकानांना वाईन्स म्हटलं जातं. त्यामुळे काही घटकांचा असा विचार झाला की हे सरकार आणखी वाईन्सची दुकानं टाकत आहेत. परंतु ती वाईन्सची दुकानं आणि द्राक्ष पासून तयार होणारी वाईन्स यामध्ये खूप फरक आहे.
काही देशांमध्ये पाण्याऐवजी वाईन्स पितात. आदरणीय शरद पवारसाहेब कृषिमंत्री असल्यापासून शेतकऱ्यांच्या मदतीला येतात, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांनीही या द्राक्ष परिषदेला हजेरी लावली होती. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदरणीय शरद पवारसाहेब नेहमीच तुमच्या मदतीला धावले. ते कृषिमंत्री असल्यापासून शेतकऱ्यांच्या मदतीला येतात. म्हणूनच या परिषदेच्या शुभारंभाला शरद पवारसाहेब आले होते.
आज समारोपाला अजित पवार आलेत. आता सगळे म्हणतील काय पवार-पवार चालवलंय. मुळातच तुमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे चेअरमनचं शिवाजी पवारच आहेत, आता सगळेच पवार म्हटल्यावर पवारांचं चाललंय काय? अशी चर्चा रंगणार, असं म्हणत अजित पवार यांनी टोलेबाजी केली.