अजित पवारांचा शिलेदार अँटी करप्शनच्या जाळ्यात ; तब्बल दीड लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले..


पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्याने पोलिसासाठी तब्बल दीड लाख रुपयांची लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून काँग्रेसचे नेते अशोक गायकवाड यांना रंगेहात पकडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यांच्या वतीने गायकवाड यांनी लाच स्वीकारली. गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यात आरोपी न करता साक्षीदार करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. होती. तडजोडीनंतर दीड लाख रुपये स्वीकारताना नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले.अशोक रामचंद्र गायकवाड, खाजगी इसम, वय 71, व्यवसाय शेती , राहणार बिशोब लॉइड कॉलनी सावेडी व राजेंद्र प्रभाकर गर्गे, वय 57, सहाय्यक फौजदार कोतवाली पोलीस स्टेशन, अशी आरोपींची नावे आहेत.

दरम्यान अडकलेले अशोक गायकवाड यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लाच घेताना पकडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तक्रारदराने नाशिक च्या पथकाकडे संपर्क केला. त्यानुसार सापळा रचण्यात आला. त्यामध्ये 21 ऑगस्टला रात्री गायकवाड यांना ही लाच स्वीकारताना पकडण्यात आले. तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!