पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…


पुणे : भाजपचे  खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

 

 

 

 

 

दरम्यान , ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान या पोटनिवडणुकीसंबधी अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.

 

 

 

यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाने अजून पोटनिवडणुकीची कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे ज्यावेळी निवडणूक आयोग घोषणा करेल त्यावेळी यावर चर्चा करणे योग्य राहील. त्यामुळे रितसर घोषणा झाल्यावर सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन ठरवतील. बिनविरोध निवडणूक होणार अशी चर्चा झाली नसल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!