अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याने आईला केली अमानुष मारहाण, पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना…

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्याने त्याच्या जन्मदात्री आईला अमानुषपणे बेदम मारहाण केली आहे. त्याच्या आईने समोर येऊन याबाबत माहिती दिली आहे. यामुळे मुलाचे पितळ उघडे पाडले आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष मारुती देशमुख याच्यावर आईला मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारुती देशमुख यांनी आईला बेदम मारहणा केल्याने त्या महिल्चेया पाठीवर, हातावर तसेच मानेवरही मारहाणीचे व्रण उठले आहेत. पदाधिकाऱ्याने मात्र हा आरोप फेटाळला आहे. अजित दादांनी पद दिलं म्हणून मला बदनाम करण्याचा हा डाव आहे. उलट आमदार सुनील शेळकेंचा माझ्यावर विश्वास आहे. असा खुलासा मारुती देशमुखांनी केला.
दरम्यान, आपली आई घरी राहायला आली हे मारुती देशमुख आणि कुटुंबियांना आवडले नाही. मग आपली आई ही पुण्यात भावाकडे परत जावी, म्हणून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप लहान मुलगा राजेंद्र यांनी केला आहे. यामुळे ही माहिती बाहेर आल्यामुळे ते संतापले. आणि यातून ही घटना घडली आहे.

यातूनच दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी आईला बेदम मारहाण केली. त्या महिलेने पुढे येत सर्व कहाणी कथन केली. पोटच्या मुलाची अब्रू वाचवण्यासाठी मी मूळगावी आले पण मुलाने मात्र माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे.
दरम्यान, आता अजित पवार कठोर पावलं उचलत मारुती देशमुखांची पक्षातून हकालपट्टी करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अजित पवार अशा समर्थकांना खपवून घेत नाहीत, ते जाहीरपणे असं बोलून ही दाखवतात. मात्र प्रत्यक्षात अजित दादा तशी कृती करताना काय दिसत नाहीत. असेही त्यांच्या भावाने म्हटले आहे.