पुण्यातील नगरपरिषदांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा डंका ; कोण -कोणत्या ठिकाणी बाजी?


पुणे:राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल समोर आला असुन सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. बारामती, माळेगाव, जेजुरी, इंदापूर, दौंड, भोर , जुन्नर , शिरूरमध्ये अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

इंदापूर मध्येही अजित पवारांची बाजी

पुण्यातील इंदापूर नगरपरिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा अवघ्या 120 मतांनी विजयी झाले आहेत. प्रदीप गारटकर अवघ्या 120 मतांनी पराभूत झाले आहेत. यामुळे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, भाजपचे प्रवीण माने आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांना मोठा धक्का बसला आहे.

भोरमध्येही अजित पवारांची बाजी

       

पुण्यातील भोर नगपालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रामचंद्र आवारे 170 मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. या पराभवाने माजी आमदार संग्राम थोपटे यांना धक्का बसलाय. भोरमधील 20 पैकी नगरसेवकपदाचे राष्ट्रवादीचे 4 उमेदवार तर भाजपचे 15 उमेदवार विजयी झाले आहेत.

बारामतीत अजित पवारांचा डंका

बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पहिल्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ उमेदवार विजयी झाले. यामध्ये अविनाश हनुमंत निकाळजे, मनीषा समीर चव्हाण, जय नानासाहेब पाटील, प्रवीण दत्तू माने, रूपाली नवनाथ मलगुंडे, संपदा सुमित चौधरी आणि विष्णू तुळशीराम चौधरी हे विजयी झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या अनुप्रिता तांबे बिनविरोध विजय झाल्या होत्या.

जेजुरीतही अजित पवारांनी उधळला गुलाल

जेजुरी नगरपरिषदेचा निकाल समोर आला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी झाले आहेत. अजित पवार गटाने भंडारा उधळला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे 17 उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपाचे दोन उमेदवार विजयी झाले आहे तसेच अपक्ष उमेदवार तानाजी खोमणे यांनी विजय मिळवत सर्वांना धक्का दिला आहे.

दौंड मध्येही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बाजी.

दौंड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दुर्गादेवी जगदाळे यांनी 5712 मतांनी विजय मिळवला आहे.

शिरूर नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा डंका

शिरूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या ऐश्वर्या पाचरणे यांनी 1925 मतांनी विजय मिळवला आहे.शिरूर हवेलीत आमदार माऊली आबा कटके यांचा दबदबा कायम राहिला आहे.

माळेगाव नगरपंचायतीत अजित पवार गटाला फटका

बारामती तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा फटका बसला आहे. या नगरपंचायतीच्या निवडणुकीत ५ पाच अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

सासवड मध्ये भाजपने बाजी मारली

सासवडमध्ये भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. सासवड मध्ये भाजपाच्या आनंदी काकी जगताप यांनी विजय मिळवला आहे. तर जुन्नर मध्ये ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सुजाता काजळे या विजयी झाल्या आहेत.

वडगाव मावळमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बाजी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनीता ढोरे या निवडून आले आहेत. त्या नगरसेवक पदाच्या उमेदवार होत्या. अवघ्या एका मताने त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. सुनिता ढोरे या प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांना एकूण 323 मते मिळाली, त्यांनी भाजपच्या पूजा यांना पराभूत केला आहे. दरम्यान पुण्यातील नगरपरिषदेवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेच बाजी मारली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!