अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांना जीवे मारण्याची धमकी, दोन दिवसात संपवणार…


अहिल्यानगर : अजित पवार गट राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वासंदर्भातील भूमिका आणि वक्तव्यांमुळे जगताप चर्चेत आहेत. यामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांना हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर पक्षामधूनच त्यांना विरोध केला जातोय. असे असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संग्राम जगतापांनी पक्षाच्या विचारधारेशी फारकत घेतलीची टीका राजकीय वर्तुळातून होत असताना आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत. या घटनेने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या आधारावर तपास करत आहेत.

यामध्ये जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा थेट जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वासंदर्भातील भूमिका आणि वक्तव्यांमुळे संग्राम जगताप चर्चेत आहेत. यामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

त्यांना हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती. संग्राम जगतापांनी पक्षाच्या विचारधारेशी फारकत घेतलीची टीका राजकीय वर्तुळातून होत होती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!