अजित पवारांची ‘ती’ मागणी क्षणात शरद पवार यांनी केली मंजूर, स्टेजवरच केली घोषणा, नेमकं काय घडलं?


पुणे : पुण्यात आज वसंतदाद शुगर इंस्टिट्यूटची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडला. यावेळी उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये दिली जाते‌. या रकमेत वाढ करण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.

अजितदादांच्या या मागणीला शरद पवार यांनी लगेच भाषणात मान्यता दिली आहे. यामुळे याची जोरदार चर्चा रंगली. या कार्यक्रमाला अजित पवार, शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान बोलताना अजित पवार यांनी, शेतकऱ्यांना, कारखान्याच्या चालकांना आणि संबधितांना काही अडचण आल्यास मला संपर्क साधा, असेही ते म्हणाले.

तसेच संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी संस्था आणि सरकारमध्ये व्यवस्थित समन्वय असण्याची गरज आहे, असं म्हणत मदतीची ग्वाही दिली. यावेळी भाषणात अजित पवार यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये दिली जाते‌.

आज दहा हजारला फारशी किंमत उरलेली नाही. त्यामुळे ती रक्कम एक लाख रुपये करण्याची मी विनंती करतो. अर्थात वाढ कधी करायची याचा निर्णय शरद पवार घेतील, असं अजित पवार यावेळी म्हणाले. यानंतर शरद पवार यांनी आपल्या भाषणात लगेच ही मागणी मान्य केली. यामुळे या शेतकऱ्यांना एक लाख रुपये दिले जाणार आहेत.

शरद पवार यांनी म्हणाले, आतापर्यंत वैयक्तीक कामगिरीबद्दल संस्थेकडून दिले जाणारे पुरस्कार दहा हजार रुपयांचे होते. आजपासून त्यांची रक्कम वाढवून एक लाख रूपये असेल, यामुळे शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले. यावेळी सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!