‘अजित पवारांचं निधन एक षडयंत्र…’ ‘या’ व्यक्तीने केला सर्वात मोठा दावा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. बारामतीत विमान लँडिंग करत असताना भीषण अपघात झाला आणि अजित पवारांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर नेते मंडळींसह सिनेकलाकारांनी दु:ख व्यक्त केलं.

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच अभिनेत्री राखी सावंत हिने केलेल्या वक्तव्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये तिने या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे.


अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या राखी सावंत म्हणाल्या, मी अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आहे. मला खूप दुःख झालं आहे. कोणी काहीही म्हणो, पण यामागे राजकारण नाही असं मला वाटत नाही. हे एक षडयंत्र आहे. असं म्हणत तिने या अपघाताबाबत थेट संशय व्यक्त केला. तिच्या या विधानामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांच्या निधनावर राखी सावंत म्हणते, मी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आले आहे. मला ही बातमी ऐकून खूप दु:ख झाले आहे. या घटनेमागे राजकारण नाही. परंतु, हे एक षडयंत्र आहे. ते आमचे एक आवडते नेता होते. ही घटना षडयंत्र आहे, बरोबर ना…?, असं तिनं पापाराझींसमोर म्हटलं होतं.
राखीचा व्हिडिओ व्हायरल….
दरम्यान, राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या आऊटफिटवरून तिला ट्रोल केलं. राखी सावंत पापाराझींसमोर बोल्ड आऊटफिट घालून आली होती. तिनं मरून रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसवरून तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे.
