विमान अपघातानंतर अजित पवारांच्या चुलत भावाचा मोठा गाैप्यस्फोट, म्हणाले, चर्चा…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे विमाने निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता गंभीर आरोप केली जात आहेत. रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. आमदार रोहित पवार बारामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहेत. त्यापूर्वीच बारामती पोलिस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे.
आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार बारामती पोलीस स्टेशन बाहेर दाखल झाले. जो अपघात घडला त्याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला गेला पाहिजे, ही लोकशाही आहे, त्यामध्ये एखाद्या घटनेचा संशय व्यक्त होत असेल तर त्यातील सत्य बाहेर आले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

पुढे बोलताना राजेंद्र पवार यांनी म्हटले की, आम्ही बारामतीकर म्हणून आमदार रोहित पवार यांच्या पाठीशी आहोत. अधिवेशनात याबाबत चर्चा होत नसेल तर आपण समजून घेतले पाहिजे नक्की काय आहे, असेही त्यांनी म्हटले. काल मुंबईमधील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार पोहोचले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. ज्यानंतर काही वेळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर आमदार रोहित पवार आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. आमदार रोहित पवारांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी बारामतीकर पोलिस स्टेशन बाहेर उपस्थित आहेत. आमदार रोहित पवार यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. अजित दादा यांचा अपघात झाला की घातपात याबाबत चौकशी झालीच पाहिजे.