पुण्यात अजित पवारांची गाडी सुस्साट! 12 तासांत फोडले 9 शिलेदार, निवडणुकीच्या तोंडावर वातावरण तापलं


पुणे : पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मोठा डाव टाकत महानगरपालिकेच्या रिंगणात उतरण्यापूर्वी भाजप, मनसे, काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांतील 9 बड्या माजी नगरसेवकांचा पक्षात प्रवेश केला आहे. अजित पवारांनी केलेल्या या प्रवेशांद्वारे पुण्यात मोठी ‘इनकमिंग’ घडवून आणली असून, पुणे पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांनी हा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शहरातील विविध प्रभागांमधील महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्या जुन्या पक्षांना रामराम ठोकला अन् अजित पवार गटात प्रवेश केला आहे.यामध्ये प्रामुख्याने भाजपचे धनंजय जाधव, मुकारी अलगुडे, शंकर पवार आणि मधुकर मुसळे यांचा समावेश आहे.

तसेच काँग्रेसचे दत्ता बहिरट, मनसेचे जयराज लांडगे, शिवसेना ठाकरे गटाच्या नीता मांजळकर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आनंद मांजळकर आणि शरद पवार गटाचे स्वप्निल दुधाने यांनीही अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारलं आहे. या मोठ्या घडामोडीमुळे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही गटांना धक्के बसले आहेत.

दरम्यान या 9 नेत्यांच्या प्रवेशामुळे अनेक महत्त्वाच्या प्रभागांमधील समीकरणे बदलणार आहेत. दुसरीकडे, या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादींनी पुण्यात युती केल्याने आणि आता या दिग्गज नेत्यांच्या प्रवेशामुळे पुण्याची लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!