अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधवांच्या कुटुंबाला मोठा आधार! तब्ब्ल ‘इतक्या’ कोटींचा विमा मंजूर…


बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला एक आठवडा उलटला आहे. गेल्या बुधवारी (२८ जानेवारी) त्यांचं विमान बारामतीजवळ क्रॅश झालं आणि त्यात अजित पवार यांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांच्यासह आणखी चौघेही मृत्यूमुखी पडले.

त्यात अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव, विमानाचे २ पायलट आणि फ्लाईट अटेंडंट यांचाही समावेश होता. दरम्यान अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्याबद्दल एक अपडेट समोर आली आहे. जाधव यांचा १ कोटींचा अपघात विमा मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विदीप जाधव यांनी ‘न्यू इंडिया इन्शुरन्स’ कंपनीचा अपघात विमा घेतला होता. त्यांच्या निधनानंतर अवघ्या पहिल्याच आठवड्यात विमा कंपनीने १ कोटी रुपयांचा दावा मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला आहे.

विदीप जाधव हे २००९ च्या बॅचचे मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल होते. २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात सेवा दिली होती. गेल्या काही काळापासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते.

विदीप जाधव हे मुंबईतील कळवा-विटावा परिसरात कुटुंबासह राहत होते. २८ जानेवारी रोजी सकाळी कामासाठी घराबाहेर पडताना त्यांच्या आईने “सांभाळून जा, लवकर ये” असा निरोप दिला होता. मात्र तीच भेट त्यांच्या कुटुंबियांसोबतची शेवटची ठरली. विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी घरात पोहोचताच संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!