अजित पवारांची मोठी घोषणा!! आता फक्त ‘याच’ महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ…

मुंबई : लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उभा योजनेच्या अंमलबजावणीच्या दरम्यान काही महिलांनी योजनेसाठी ठरवलेल्या निकषांनुसार पात्रता गमावली आहे. कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या, 65 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या महिलांसाठी ही योजना आहे.

आधीच योजनेसाठी काही अटी पार न करणाऱ्या सुमारे पाच लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. शेतकाम करणाऱ्या, धुणीभांडी करणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या, गरीब आणि भाजी विकणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना आता आणखी सुधारली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, शेतकाम करणाऱ्या, धुणीभांडी करणाऱ्या, इतर गरीब महिलांसाठी ही योजना आहे. तसेच, महिना उत्पन्न 20,000 रुपये असलेल्या महिलांसाठी ही योजना लागू आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या वाढल्याने काही अपत्य असलेल्या आणि उच्च उत्पन्न असलेल्या महिलांना योजना मिळाली होती.

असे असताना एकदा लाभ मिळाल्यानंतर तो परत घेतला जाणार नाही. जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. आता महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता देखील जमा होणार आहे. मात्र नियम कडक करण्यात आले आहेत.
योजनेत भाग घेतलेल्या महिलांची संख्या वाढली आहे आणि याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. अनेकांनी कारवाईच्या भीतीने पैसे नको म्हणून अर्ज केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात संख्या अजूनच कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.