Ajit Pawar : अजितदादांचा केंद्रातही दिसणार वचक! मंत्रीमंडळ विस्तारामध्ये राज्यासह केंद्रात दिली जाणार ३ मंत्रीपदे..
Ajit Pawar मुंबई : राज्य मंत्री मंडळाचा आणखी एक विस्तार घटस्थापनेनंतर होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. यंदाच्या मंत्री मंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आणखी आमदारांना संधी मिळणार असून कॅबिनेटमध्ये आणखी मंत्र्यांची भर पडणार आहे. Ajit Pawar
आगामी मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे आणि केंद्रात देखील एक कॅबिनेट पद अजित पवार गटाच्या वाट्याला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Ajit Pawar
अजित पवारांनी महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे दुसऱ्याच मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अजित पवार गटाच्या ९ आमदारांना मंत्री पदे देण्यात आली. यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या अपेक्षेवर पाणी फिरले. आता पुन्हा एकदा मंत्रीमंडळ विस्तार होणार असून यावेळी देखील अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून येणार आहे.
यावेळी करण्यात येणाऱ्या विस्तारामध्ये अजित पवार गटाची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. सत्तेत सहभागी होतानाच अजित पवार यांना याबद्दल आश्वासन दिले असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार घटस्थापनेनंतर देखील रखडल्यास अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये ते करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप न सुटलेला पेच यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील अजित पवार हे अनुपस्थित होते.
त्यामुळे त्याच्या नाराजीची अधिकच चर्चा सुरू झाली आहे. नाराजी नाट्यानंतर अजित पवारांनी तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. आता मंत्रीमंडळ विस्तार झाला तर त्यामध्ये देखील अजित पवार गटाचा वरचष्मा पाहायला मिळत आहे.
आता मंत्रीमंडळ विस्तार झाला तर त्यामध्ये देखील अजित पवार गटाचाच प्रभाव दिसून येणार आहे. यंदाच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे आणि केंद्रात देखील एक कॅबिनेट पद दिले जाणार आहे.