पुणे लोकसभेच ठरलं! अजित पवारांनी प्रशांत जगताप यांना दिल्या शुभेच्छा..

पुणे : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे. यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्याचे भावी खासदार म्हणून शहरात काही नेत्यानी फलकबाजी सुरु केली आहे.
यावरुन राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी या भावी खासदारांना मिश्किलपणे टोला लगावला. या जागेवर काँग्रेसकडून आधीच दावा करण्यात आला आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृत, ठोस भाष्य कोणी केले नव्हते.
पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप याचे पोस्टर पुण्यात भावी खासदार म्हणून लागले होते. यावर अजित पवार म्हणाले, प्रशांत जगताप यांना खासदार होण्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. पुणे लोकसभेचा उमेदवार घटक पक्ष एकत्र बसून ठरवू.
नवा चेहरा दिल्यास जनताही त्याला पसंत करते. प्रशांतच्या मनात काय आहे, हे आधी जाणून घेतो. मग माझ्या मनातले सांगतो. यामुळे आता कोणाची उमेदवारी फिक्स होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.