Ajit Pawar : आजपासून अजित पवार अधिवेशनात होणार सक्रिय, सुनील तटकरे यांनी दिली माहिती..


Ajit Pawar : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये आता नाराजीचा विस्तारही झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाराजीनाट्य सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेदेखील मागील दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते.

नॉट रिचेबल असणारे अजितदादा आज अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. आपल्या शासकीय निवासस्थानी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. अशातच आता मागील दोन दिवसांपासून विधिमंडळ कामकाजात सहभागी न होणारे अजित पवार बुधवारी विधिमंडळ कामजात सहभागी होणार आहेत.

अजित पवार यांना थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे ते अधिवेशनामध्ये सहभागी झाले नव्हते. अजितदादा दिल्लीला गेल्या असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट केले आहे. Ajit Pawar

अजितदादांना घशाचा संसर्ग झाल्यामुळे ते दोन दिवस अधिवेशनात सहभागी झाले नव्हते. या काळात ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी आराम करत होते अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

अजित पवार हे दिल्लीला गेले असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात अजित पवार यांनी मात्र भाग घेतला नव्हता. या काळात अजितदादा दिल्लीला गेल्या असल्याची चर्चा सुरू होती.

दरम्यान, राज्यात नवीन सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे पहिलंच अधिवेशन आहे. यामध्ये मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!