Ajit Pawar : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मोठी घोषणा! लोकसभेच्या कोणत्या जागा लढवणार, जागा केल्या जाहीर…


Ajit Pawar : अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यावर ते कोणत्या जागा लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयार सुरू केली आहे. आता महायुतीत लोकसभेच्या चार जागा अजित पवार गट लढवणार असल्याचे आज अजित पवारांनी जाहीर केले आहे.

यामध्ये बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणारच आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. यामुळे आता शरद पवार गट काय भूमिका घेणार हे लवकरच समजेल. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. Ajit Pawar

याबाबत अजित पवार म्हनाले की, मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे.

तसेच महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून आणायचे आहेत. जागावाटपासंदर्भात सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत.  काही जण आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या म्हणून हे तिकडे गेले.

मी कॅबिनेटमध्ये त्या खात्याचा मंत्री होतो म्हणून मला टार्गेट केलं गेलं पण ते आरोप सिद्ध झाले नाही. मंत्री आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ते आदेश दिले होते. राज्यात ते सातत्याने भारनियमन २०१२ रोजी होत होते ते आम्ही बंद केले. आज माझ्याकडे अर्थ खातं आहे. सहा लाख कोटींचे बजेट आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!