Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके आहेत कुठे? प्रकृतीबाबत महत्वाची माहिती आली समोर…

Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार हे प्रचाराच्या धामधुमीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात त्यांनी स्वत:हून सर्वाधिक लक्ष घातल्याचं पाहायला मिळाले होते.
अजित पवार यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यांसाठी अजित पवार यांनी सभा घेतली होती. यामुळे अजित पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांची तब्येत बिघडली…
प्रचारसभांच्या धावपळीमुळे अजित पवार यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रोडशो’ला देखील जाता आलं नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार त्याठिकाणी उपस्थित नसल्याने ते नॉटरिचेबल आहेत का? असा सवाल केला जात होता. मात्र अजित पवार यांच्या घशाला इन्फेक्शन झाल्याची माहिती मिळत आहे. Ajit Pawar
दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते उमेश पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या यांच्या घशाला इन्फेक्शन झाल्याचं उमेश पाटील यांनी माहिती दिली आहे. यामुळे अजित पवार हे नॉटरिचेबल असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.