सोन्याच्या जेजुरीत अजित पवारांनी उधळला विजयाचा भंडारा, 17 उमेदवारांसह एकहाती फडकवला झेंडा…


जेजुरी : जेजुरी नगरपरिषद मतमोजणी निकाल समोर आला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी झाले आहे. जेजुरीत अजित पवार गटाने भंडारा उधळला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे 17 उमेदवार विजयी झाले आहेत.

तर भाजपा गटाचे दोन उमेदवार विजयी झाले. तसेच अपक्ष उमेदवार तानाजी खोमणे यांनी विजय मिळवत सर्वांना धक्का दिलाय. अजित पवार गटाने काँग्रेसची धुळधाण केली असून तब्बल 11 जागा जिंकत नगरपरिषदेवर झेंडा फडवकला आहे.

जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत 15,800 मतदारांपैकी 12,333 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुमारे 78 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या एकूण 53 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झालं होतं. अशातच आता अजित पवार गटाने दणदणीत विजय मिळवला आहे.

जेजुरी नगरपरिषद ही पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांचा एक भाग होती आणि या नगरपरिषदेसह महाराष्ट्रातील इतर नगरपरिषदांमध्ये नोव्हेंबर 2016 ते जानेवारी 2017 या कालावधीत चार टप्प्यांत निवडणुका पार पडल्या. राज्य निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली घेण्यात आलेल्या या निवडणुकीत या नगरपरिषदेतील एकूण 17 प्रभागांचा समावेश होता. 2017 मध्ये राष्ट्रवादीला इथं फक्त सहा जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला 11 जागेवर समाधान मानावं लागले होते.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!