अजित पवार यांना निवडणूक आयोगाने दिली क्लीन चिट , काय झाली होती तक्रार ..!!

Ajit Pawar : महाराष्ट्रात बारामतीच्या जागेवर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे, त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जोरात प्रचार करताना दिसत आहेत. अशातच निवडणुकीपूर्वी अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अजित पवार यांना निवडणूक आचार संहिता भंग प्रकरणी क्लीन चिट मिळाली असून प्रचारसभेदरम्यान अजित पवारांनी बोलताना निधावाटपाबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती. पण आता याप्रकरणी त्यांना क्लीनचिट मिळाली आहे.
काल RO ने राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात अजित पवारांनी बारामती मतदारसंघातील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग झाला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघात यंदा नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळणार आहे. जरी ही लढत नणंद विरुद्ध भावजय अशी असली तरी खरी लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच असणार आहे.
Views:
[jp_post_view]