Ajit Pawar : फिक्स झालं!! विलास लांडे तुतारी फुंकणार, अजित पवारांचे टेन्शन वाढलं….

Ajit Pawar : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. तर, इच्छुक उमेदवारांनीही प्रमुख पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
त्यातच आता विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी मोठी घोषणा केली आहे. विलास लांडे विधानसभेला तुतारी फुंकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले माजी आमदार विलास लांडे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती.
त्यानंतर हातातील घड्याळ बाजूला करत ते तुतारी हातात घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. मात्र मागील काही दिवसात अनेकदा विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मात्र पक्षांतर करण्याबाबत त्यांनी नेहमीच संभ्रावस्था ठेवली. Ajit Pawar
त्यामुळे जोपर्यंत विलास लांडे हातात तुतारी घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचा प्रवेश निश्चित कसा मानायचा? अशी चर्चा यानिमित्ताने पुन्हा एकदा शहरात रंगलेली आहे. दरम्यान, याच संदर्भात विलास लांडेंचे पुत्र विक्रांत लांडे यांनी ते तुतारी हातात घेणार असल्याचे सांगितले आहे.