Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा होणार मोठा भूकंप? अजित पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद…


Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. यामुळे महायुतीसरकारने विविध निर्णयांचा सपाटा लावला आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आली.

सरकारमधील अनेक मंत्री अर्थखात्याच्या विरोधानंतरही कॅबिनेट बैठकीच्यापूर्वी शेवटच्या क्षणाला महत्त्वाच्या योजनांचे प्रस्ताव मांडत असल्यामुळे अजित पवार नाखूश आहेत. त्यामुळेच अजित पवार हे गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अवघ्या १० मिनिटांत निघून गेल्याचे सांगितले जात आहे.

त्यातच आता दसऱ्याआधी अजित पवार सीमोल्लंघन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. Ajit Pawar

त्यामुळे अजित पवार काय भूमिका मांडतायेत याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले आहे. अजित पवारांनी नाशिकमध्ये बोलताना बारामतीत परत जाण्याच्या घोषणा केल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, त्यामुळे या पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार काय बोलणार याची चर्चा सुरू झाली आहे. आजच्या या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे देखील उपस्थित राहणार आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादा काय बोलणार याकडे सर्वांचचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!