जिल्हा परिषदेसाठी अजित पवारांनी भाकरी फिरवली ; घेतला मोठा निर्णय? संघटनेत नव्या नियुक्त्या?


पुणे: पुणे महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता तात्काळ जिल्हा परिषद निवडणुकांसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठे संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत.त्यासाठी नवीन नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी ऐनवेळी पक्षप्रमुख निलेश थिगळे यांच्यावर जिल्हा युवक संघटनेची मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निलेश थिगळे यांनी तयारीही सुरू केली होती. आता या युवा नेतृत्वाला संधी देऊन अजित पवारांनी डाव टाकला आहे.

कोण आहेत निलेश थिगळे?

गेल्या ९ वर्षांपासून पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निलेश थिगळे कार्यरत होते. थिगळे हे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरचे आहेत. संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव आणि युवकांमध्ये असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांच्यावर आता अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

थिगळे म्हणाले, पक्ष संघटनेच्या माध्यमातून काम करणारे अनेक नेते आज राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दादांनी मला विश्वासात घेऊन माझी गरज सध्या पक्षाला अधिक असल्याचे पटवून दिले. त्यामुळे त्यांनी दिलेली जबाबदारी मी नक्कीच पूर्ण ताकदीने पार पाडेल असे आश्वासन त्यांनी दिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!