अजित पवारांचे आजचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द, राजकीय घडामोड घडणार
पुणे: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपात जातील अशी चर्चा सुरू आहे. अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता, परंतु ते अद्याप मुंबईतच आहे, अशी माहिती आहे.
अजित पवार यांचे अचानक सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार दिल्लीला रवाना झाले आहेत.
यामुळे ते कशासाठी गेले आहेत. हे लवकरच समजेल. हे दोन्ही नेते अमित शाहांना भेटणार असल्याची माहिती आहे. आज पुण्यात अजित पवारांचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन, मोटार सायकल रॅली, नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन व नळ पाणी पुरवठा योजना भूमीपूजन असे कार्यक्रम पुण्यात होते.
असे असताना मात्र सदर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अजित पवार हे अद्याप मुंबईतच आहे. दरम्यान, अजित पवार यांनी अमित शाह यांची गुप्त भेट घेतली अशी चर्चा आहे. मात्र, या वृत्ताला अजित पवार यांनी फेटाळले आहे.