Ajit Pawar : काटेवाडीत जाताना अपघात पाहिला, अजितदादांनी गाडी थांबवली अन्…, सगळेच पाहत राहिले, नेमकं काय घडलं?


Ajit Pawar : आज उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नवा चेहरा सगळ्यांना पाहायला मिळाला आहे. ताफा थांबवत अजितदादांची अपघातग्रस्ताला मदत केली आहे. आपल्या ताफ्यातील गाडीतून रुग्णाला रुग्णालयात पाठवलं आहे आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टरांना उपचाराबाबत सुचनादेखील दिल्या आहे.

अजित पवारांच्या या कृत्याने अजित पवारांनी अनेकांची मनं जिंकली आहेत. बारामतीहून काटेवाडीकडे जात असताना वाटेत झालेला अपघात पाहून क्षणात आपला ताफा थांबवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जखमी झालेले जेष्ठ पत्रकार रामभाऊ तावरे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रुग्णालयात उपचाराच्याही सुचना दिल्या.

याबाबत अधिक माहिती अशी, सोनगाव येथील आनंदराव देवकाते पत्नी संगीतासह आपल्या कारमधून बारामतीहून सोनगाव कडे निघाले होते. त्यावेळी रामभाऊ तावरे यांच्या दुचाकीची कारला धडक होऊन तावरे खाली पडले. त्यानंतर काही वेळातच तिथून कन्हेरीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली गाडी थांबवण्याच्या चालकाला सूचना दिल्या. Ajit Pawar

हे तर रामभाऊ, असं म्हणत तातडीने स्वत:च्या ताफ्यातील गाडीत तावरे यांना बसवले, सोबत काही लोक दिले आणि दवाखान्यात पाठवले. तावरे यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे.

मात्र अशातही क्षणाचा विलंब न लावता अजितदादांनी स्वतः पुढे होत दाखवलेली ही तत्परता सर्वांना भावली. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना देखील रामभाऊ तावरे यांच्या उपचाराबाबत कळवले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!