अजित पवारांचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी…! जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ…!
मुंबई : गेल्या काही वर्षांपूर्वी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी घेतला होता. यामुळे अजित पवार यांनी का भाजपसोबत शपथ घेतली असा प्रश्न अनेकांना पडला. आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते, तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पर्याय नसल्याने, ही खेळी असू शकते, असे म्हटले आहे.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं. राष्ट्रवादीत बंडखोरी झाली नाही. शिवसेनेचे आमदार गेल्याने सरकार पडले. राष्ट्रवादीने शिवसेनेला शेवटपर्यंत साथ दिली असेही जयंत पाटील यावेळी ते म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाशी युती केल्यानंतरच्या पत्रकार परिषेदत प्रकाश आंबेडकरांनी आत्ता आमची युती ठाकरे गटासोबत झाली आहे. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस लवकरच आमच्यासोबत येतील अशी आशा बाळगतो असे म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.