मोठी बातमी! अजित पवार, सुनेत्रा पवार यांना ईडीकडून क्लीनचिट..?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे.
यामुळे अजित पवार अडचणीत आले होते. या घोटाळ्याप्रकरणी ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याची जमीन इमारत, मशिनरी मिळून ६५ कोटी रुपयांची मालमत्ता जुलै २०२१ मध्ये जप्त केली होती. अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित ही कंपनी आहे.
ईडीने आता अजित पवारांशी संबंधित या कंपनीला आरोपी बनवलं आहे. तसेच कंपनीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे. हे पुरवणी आरोपपत्र आहे. मात्र, त्यात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उल्लेखही नाही.
त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार यांना ईडीने क्लीनचिट दिली की काय? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नावे ईडीच्या आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत.