Ajit Pawar : अजित पवारांनी बारामतीत आखली रणनीती! गुरुवारी तालुक्यात तब्बल सात सभा, उमेदवारीही जाहीर करणार?
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत.
तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत निवडणूकमय वातावरण झालेले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत मेंळावे व भेटीगाठींचा धडाका लावलेला असून दुसरीकडे आता मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामती तालुका पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी (ता.१४) अजित पवार बारामती तालुक्यामध्ये एकाच दिवशी सात सभा घेणार आहेत. बारामती तालुक्यातील सर्व गावातील कार्यकर्त्यांना या सात सभांना वेगवेगळ्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी या सभांना उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. Ajit Pawar
शरद पवार, सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात तालुक्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे. विविध मेळाव्यांच्या माध्यमातून हे तिघेही तालुक्यातील मतदारांच्या संपर्कात असून आता यामध्ये अजित पवार धडाकेबाज सुरुवात करणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी बारामती तालुक्यात एकाच दिवशी सात सभा घेणार आहेत. यासाठी बारामती तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
दरम्यान, गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार सुपे येथील माऊली गार्डन, कोऱ्हाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयसमोर सभा घेणार आहेत. ग्रामपंचायत झारगडवाडी, करंजेपुल चौक, अमरसिंह कॉलनी माळेगाव बुद्रुक, ग्रामपंचायत नीरावागज व बारामती शहरातील मुक्ताई लॉन्स, पेन्सिल चौक या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार सभा घेणार असून बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणार आल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.