राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार! अजित पवार प्रदेशाध्यक्ष तर जयंत पाटलांकडे…?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. शरद पवार यांनी आधीच भाकरी फिरवून दोन कार्याध्यक्ष नेमले आहेत. असे असताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना मोठे वक्तव्य केले.
अजित पवार म्हणाले, विरोधी पक्षनेतेपद नको, पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, त्या पदाला न्याय देईल. अजित पवार यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
अजित पवार यांनी असे वक्तव्य का केले, अशी चर्चा सुरू आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा भाकरी फिरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पाच वर्षापासून या पदावर आहेत.
त्यामुळे आता अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर यामध्ये बदल होणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पद दिले तर जयंत पाटील यांच्यावरही मोठी जबाबदारी द्यावी लागले. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.
जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेते पद दिले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल दिसतील.
याबाबत आता शरद पवार निर्णय घेणार आहेत. मला विरोधी पक्ष नेते पदावर इच्छा नव्हती. मात्र, सगळे आमदार बोलले तुम्ही व्हा म्हणून जबाबदारी घेतली, असेही अजित पवार म्हणाले.