Ajit Pawar : राहुल कुल व्यासपीठावर गहिवरले! अजित पवार यांनी दिला तात्काळ धीर..!!

Ajit Pawar दौंड : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज दौंड शहरातील तालुक्यातील चौफुला येथे पार पडला. यावेळी आमदार राहुल कुल हे दौंड तालुक्याची पार्श्वभूमी तसेच वडील सुभाष कुल यांच्या आठवणी सांगत असताना त्यांना गहिवरून आले.

दिवंगत आमदार सुभाष कुल यांच्या आठवणीने त्यांना बोलता येईना, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.उपमुख्यमंत्री अजित पवार येथे उठले आणि राहुल कुल यांना समजावले. त्यानंतर राहुल कुल यांनी पुन्हा भाषणाला सुरूवात केली.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पुरंदर, इंदापूर तालुक्यातील महायुतीचे नेते घराबाहेर पडले आहेत. Ajit Pawar

त्यापाठोपाठ आता दौंडचे भाजप आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह महायुतीचे सर्व नेते एकत्र येऊन प्रचाराला लागले आहेत.