Ajit Pawar : पुणे बाजार समितीचा काही बाजार ‘यशवंत’च्या जमिनीत चालू करुन कारखाना सुरू करु, पण माऊली कटकेंना विधानसभेत पाठविण्याची जबाबदारी घ्या, अजित पवार यांची मतदारांना साद…


Ajit Pawar उरुळीकांचन : अण्णासाहेब मगर यांच्यानंतर हवेली तालुक्याच्या पूर्व भागाला मोठ्या पदावर बसण्यासाठीची संधी या भागाला फार काळ मिळाली नसली तरी यावेळी नेतृत्वाची भरून काढण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. हवेली तालुक्यात पालकमंत्री असताना, प्रत्येक समस्येवर काम केले आहे. पुढील काळात ‘यशवंत’ कारखान्याच्या जमिनीवर पुणे बाजार समितीचा बाजार बसवून या मोबदल्यातून कारखाना सुरू करण्यासंदर्भात सर्व परवानग्या देऊन कारखान्याचा निर्णय निकालात काढू असे ठोस अश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

शिरूर- हवेली विधानसभा मतदार संघातील महायु‌तीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचारानिमित्त लोणी काळभोर (ता.हवेली) येथील खोकलाई चौकात शनिवारी (ता.9) झालेल्या सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या धोरणावर टिकास्त्र सोडून शिरुर-हवेली तालुक्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. सभेस माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पिडीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, सुरेश घुले, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, घोडगंगाचे संचालकदादा पाटील फराटे, प्रशांत काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, वैशाली नागवडे, पूनम चौधरी चित्तरंजन गायकवाड, आबा काळे, नवनाथ काकडे, अमितबाबा कांचन
आदी जण उपस्थित होते. Ajit Pawar

 

अजित पवार म्हणाले, हवेली तालुका एकसंध नसल्याने या तालुक्यातील पूर्व भागात नेतृत्वाची उणीव भासली आहे. मात्र या भागात जिल्हा परिषदेचे काही पदे देऊन आम्ही या भागाचाही विचार केला आहे. आता विधानसभेसाठी या भागातील उमेदवार दिला असून त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यायची आहे. हवेली तालुक्यातील वैभव असलेल्या यशवंत कारखाना सुरू होण्यासाठी नवीन संचालक मंडळ सातत्याने माझ्याशी चर्चा करीत आहेत. त्यासाठी कर्जाची एकरकमी परतफेड,बॅकांशी चर्चा तसेच काही मुद्दांवर सकारात्मक बोलणी सुरू आहे. त्यासाठी या मुद्दावर पुणे बाजार समितीचा मार्केयार्ड मधील काही बाजार कारखान्याच्या जागेत आणून सुरू करण्याचा प्रयत्न आहे. काही जागेवर कारखाना सुरू राहिल काही जागेवर मार्केट सुरू राहिल अशा चांगला प्रस्ताव तयार करुन सर्व परवाणग्यादेऊन कारखाना सुरू करण्यासाठीचे प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर पुढील काळात या भागात उरुळीकांचन पर्यंत मेट्रो, उड्डाणपूल यासंदर्भात नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहे. नगर रस्त्यावर एल अँड टी कंपनीकडून वाघोली ते शिक्रापूर पर्यंत एलिवेटेड उड्डाणपूलासाठी डीटीआर तयार असून नितीन गडकरी यांच्या माध्यमातून निधीची तरतूद करुन ते काम पूर्ण करु.

 

‘घोडगंगा’ कारखान्याबाबत सर्व सभासदांना विश्वासात घेऊन त्या कारखान्याला एनसीडीसीचे अर्थिक पॅकेज मिळवून देऊन कारखाना सुरू करण्याचा भर देण्यात येईल. महायुतीचे सरकार या तालुक्यांसाठी पुढील काळात ५हजार कोटींची विकास कामे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतू आपण महायुतीचे सरकार यांच्या पाठिमागे उभे राहून उमेदवारांना निवडून देण्याचे भूमिका घेतली पाहिजे असे ते म्हणाले. सभेत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, प्रदिप कंद, माऊली कटके , सुरेश घुले यादींची भाषणे होऊन माऊली कटके यांना विजयी करण्याचे आवाहन केले. दरम्यान सभेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

भावकी उण्याची वाटेकरी असते इथे पण ..?

सभेत महाविकास आघाडी चे उमेदवार अशोक पवार यांच्यावर फारसे भाष्य न करता अजित पवार म्हणाले ‘भावकी कशी असते , असे म्हणते आमची भावकी मात्र उण्याचे वाटेकरी न होता माझी बदनामी करीत आहे. मी माझे सर्व कारखाने व्यवस्थित चालविले आहे. ते चांगले दर देत आहे. मात्र यांनी कारखाना चालविताना सर्व नियोजन चुकविले, सह विजनिर्मिती प्रकल्प चालविता आला नाही. कसलेही नियोजन नाही , कारखाना बंद पडल्यावर पोरगा चेअरमन केला आणि माझी ‘बदनामी करतोय मला बंद पाडायचा’ मला तसे करायचे असते तर व्यंकटेश बंद करणे अवघड नव्हते असे ते म्हणाले.

प्रदिप कंद यांना संधी देणार!

अजित पवार यांनी विधानसभेला बारामती मधून निवडणूक लढविण्याची माझी इच्छा नव्हती असे सांगून शिरुर, पुरंदर,सिन्नर या मतदारसंघात उभे राहण्याची माझी इच्छा होती.परंतु बारामतीचे माझे मतदार गाडीच्या पुढे झोपून आत्मदहन करण्याचा इरादे देऊ लागल्याने मी निर्णय बदलला. मी प्रदिप कंद यांना मी शिरुरमधून लढणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी होकार देऊन निवडून देऊ असे शब्द दिला होता. त्यामुळे भविष्यात प्रदिप कंद यांना संधी देण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन संधी देणार असल्याचे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!