Ajit Pawar : मशीनमध्ये कचाकचा बटन दाबा, मग माझाही हात…!! अजित पवारांचे भर सभेत वक्तव्य..


Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीमुळे दिग्गज नेते मंडळी प्रचार सभांचा धडाड घेत आहेत. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मागे नाहीत. तर अजितद पवार भाजप आणि शिंदे गटासोबत युतीमध्ये असल्याने ते स्टार प्रचारक आहेत.

तसेच अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी जाणले जातात. मात्र हा स्वभाव कधी कधी अडचणीतही आणू शकतो. याचे ताजं उदाहरण म्हणजे अजित पवारांनी इंदापूरमध्ये केलेलं वक्तव्य. आम्ही तुम्हाला निधी देतोय, त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा. तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल असं अजित पवार म्हणाले. ते इंदापुरात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजेल तेवढा  निधी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा म्हणजे मला निधी द्यायला बर वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल. Ajit Pawar

जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी कामे केली आणि करतो आहे. मला काम करायला आवडतात. मला आदेश द्यायची सवय झाली आहे त्यामुळे मी अधिकाऱ्यांना आदेश देत असतो पण कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा नसतो. कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरी बसवतील. कार्यकर्त्यांशी नीट बोलावं लागत त्यांना सांभाळावे लागते, असे देखील अजित पवार म्हणाले आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी पुण्यात होणाऱ्या सभेबाबतही मोठी माहिती दिली. उद्या देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यात सभा होणार आहे. तसेच उद्याच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!