रोहित पवारांनी अखेर पाडलं पाऊल; अजित पवार विमान अपघात प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट, राज्य…

बारामती : मुंबईहून 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीकडे निघालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळालगत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अजित पवार यांचाही यात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेने राज्यभरात शोककळा पसरली आणि अनेकांना या बातमीवर विश्वास ठेवणं कठीण झालं.

दरम्यान, या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. हा केवळ अपघात होता की त्यामागे घातपाताचा संशय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून या घटनेभोवतीचे गूढ अधिकच गडद झाले आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर बंगळूर पोलिसांनी या प्रकरणात मोठ्या गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या संदर्भात झिरो एफआयआर नोंदवून पुढील तपासासाठी हा गुन्हा महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग येण्याची शक्यता असून, अपघातामागील कारणांचा सखोल तपास होणार आहे.
या संदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, घटना कुठेही घडली असली तरी ‘झिरो एफआयआर’ कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवता येतो.
राज्यातील काही पोलीस ठाण्यांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास नकार दिला किंवा ते शक्य नसल्याचे सांगितल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी थेट बंगळूरमध्ये जाऊन एफआयआर नोंदवला. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखी गंभीर वळण मिळाले आहे.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या तक्रारीत गंभीर दावा करत म्हटले आहे की, हा केवळ अपघात नसून अजित पवार यांना लक्ष्य करण्यासाठी रचलेला हेतुपुरस्सर कट असण्याची शक्यता आहे. त्यांनी विमान संचालनातील निष्काळजीपणा, सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि नोंदींमध्ये फेरफार झाल्याचाही आरोप केला आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी संबंधित विमान कंपनीवरही आरोप केले असून या संदर्भात त्यांनी दिल्लीत जाऊन अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घडामोडींमुळे या दुर्घटनेभोवतीचा संशय अधिक गडद होत असून तपासात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.