Ajit Pawar : दौंड शुगरचे मोळीपूजन, अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाचा विरोध, सुनेत्रा पवारांनी घेतला मोठा निर्णय..
Ajit Pawar : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मनोज जरांगे सध्या प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत.
बारामतीपाठोपाठ आता दौंड शुगरचे मोळीपूजन करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाने विरोध केला आहे. मोळीपूजन अजित पवारांच्या हस्ते करू नका अशा आशयाचे पत्र मराठा क्रांती मोर्चाकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आले होते. Ajit Pawar
मोळीपूजन करण्यास अजित पवार आले तर त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला होता. अशातच आता अजित पवार या मोळीपूजनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती कारखान्याकडून दिली आहे.
दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला अजित पवारांच्या उपस्थित राहण्याला मराठा क्रांती मोर्चाने विरोध केल्यानंतर आता पवार कुटुंबीयांनी मोठा निर्णय घेतला आहे.
दौंड कराखान्याच्या मोळीपूजनाचा हा कार्यक्रम त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या हस्ते होणार आहे. अजित पवारांच्या या खासगी मालकीच्या असलेल्या कारखान्याचे मोळीपूजन गुरुवारी होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झालेली आहे.
दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या मोळीपूजनाला अजित पवार उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे हे मोळी पूजन अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. अजित पवारांच्या हस्ते मोळीपूजन करू नका अशा आशयाचे पत्र मराठा क्रांती मोर्चाने पोलीस प्रशासनाला दिलं होतं.
जर अजित पवार आले तर अजित पवारांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला होता. त्यानंतर आता अजित पवार या मोळीपूजनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती कारखान्याच्या वतीने देण्यात आली आहे.