मोठी बातमी! अजित पवार अॅक्शन मोडवर, थेट पुण्यातील नगरसेवकांना दिले महत्वाचे आदेश, नेमकं काय म्हणाले?

पुणे : राज्यात सत्तेत असलेले पक्ष अर्थात भापजा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात अनेक ठिकाणी निवडणुका लढताना दिसले. महापालिकांच्या निवडणुकीत सर्वात जास्त जर कोणत्या महापालिकेची चर्चा असेल तर ती पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची.

कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडून चक्क काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली. थेट भाजपा आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे सत्रही रंगताना दिसले.


दुसरीकडे पुण्यात भाजपाचे मंत्री मुरलीधर मोहोळ आणि अजित पवार यांच्यातही शीतयुद्ध रंगले. युतीचा धर्म पाळला जाईल आणि एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाणार नसल्याचे अनेकदा सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात तसे काही होताना दिसले नाही.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्य निवडणुकीमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामध्येच पक्षाची एकवेळा पिंपरी चिंचवडमध्ये तरी कामगिरी ठीक राहिली. मात्र, दादांना पुणेकरांनी साफ नाकारल्याचे निकालातून पुढे आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेतही भाजपा हाच मोठा पक्ष ठरला. २०१७ लाही पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता होती. त्यावेळी भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मोठे नेते निवडणुकीच्या अगोदर फोडले.
दरम्यान, अजित पवार यांनी नुकताच पुणे महापालिकेत निवडून आलेल्या आपल्या नगरसेवकांना चांगलाच कानमंत्र दिला असून स्पष्ट शब्दात अजित पवार यांनी म्हटले की, पुणेकरांनी विरोधात बसण्याचा कौल दिला असून आपण आपली कामगिरी चोखपणे पार पाडले पाहिजे. नवनिर्वाचित नगरसेवकांनी महापालिकेच्या कारभाराचा पूर्ण अभ्यास करावा आणि पुणेकरांची बाजू प्रखरपणे महापालिकेच्या सभागृहात मांडावी, असे त्यांनी नगरसेवकांना सांगितले.
