Ajit Pawar : लोकसभेला अजित पवार गटाने प्रचार केला नाही, आता आम्हीही करणार नाही!!! भाजप आमदारांनी केला ठराव…


Ajit Pawar : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे.

राज्यात महायुतीचे सरकार आहे. या महायुतीत शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. महायुतीकडून आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर महायुतीमधील पक्षांमध्ये वाद आहे.

हे वाद सोडवणे वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. आता पुणे येथील भाजप आमदारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात ठराव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार न करण्याचा ठराव पक्षाच्या बैठकीत आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. या नेत्यांचा पिंपरीत अजित पवार गटाचे नेते अण्णा बनसोडे यांना विरोध आहे. Ajit Pawar

पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करायचा नाही, असा ठराव भाजपने केला आहे. आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे, भाजप नेते सदाशिव खाडे, भाजप प्रवक्ते राजू दुर्गे यांनी पक्षाच्या बैठकीत हा ठराव समंत केला आहे.

या सर्वांचा आमदार अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. लोकसभा निवडणुकीत कमळाचा उमेदवार मिळाला नाही, आता आम्हाला कमळाचाच उमेदवार हवा आहे, अशी आग्रही भूमिका बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर उमटला. लोकसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा प्रचार केला नाही, असा आरोप कार्यकर्त्यांनी बैठकीत केला. अजित पवार यांच्या पक्षाकडून युतीचा धर्म पाळण्यात नाही, मग आपण घड्याळाचा प्रचार का करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!