Ajit Pawar : ब्रेकिंग! राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? छगन भुजबळ यांच्या नाराजीनंतर अजितदादा नॉट रिचेबल…

Ajit Pawar : रविवारी महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथ विधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाला आहे.
त्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. मागील २४ तासांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोणालाही भेटले नाही. अजितदादा नॉट रिचेबल असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये आता नाराजीचा विस्तारही होऊ लागला आहे. महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्कातंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. Ajit Pawar
मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकीकडे छगन भुजबळांची नाराज आहेत. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील २४ तासांपासून कुणालाच भेटले नाहीत. काल, सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित राहिले नाहीत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नागपुरातील विजयगड निवासस्थानी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार बंगल्यावर नसल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवारांना भेटण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे. तर, दुसरीकडे अजितदादा नॉट रिचेबल नसल्याने चर्चांना उधाण आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. नागपूरमध्येच भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडेही पाठ फिरवली आहे.