Ajit Pawar : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? पुणे जिल्ह्यातील अजितदादांच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी, शरद पवार गटात जाण्याची शक्यता…
Ajit Pawar : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजेच राष्ट्रवादीचे नेते मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे. वळसे पाटील पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.
एकीकडे मंत्रिमंडळ बैठकीला दांडी तर दुसरीकडे वळसे पाटील हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील आता हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. Ajit Pawar
पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील शरद पवार गटात जाणार?
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत आले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आत पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे, तसेच ते पुण्यात शरद पवार यांची देखील भेट घेणार असल्याची चर्चा आहे. वळसे पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यास हा अजित पवार आणि राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे.