Ajit Pawar : मीरा बोरवणकरांच्या पुस्तकात अजित पवारांवर धक्कादायक आरोप, आता पवार म्हणाले, त्या प्रकरणात..
Ajit Pawar पुणे : उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी आणि पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातून कथितरित्या करण्यात आलेल्या आरोपांवर अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. यासाठी त्यांनी सन २००८ मध्ये शासनानं काढलेला एक जीआरच सादर केला.
तसेच आपला या प्रकरणाशी संबंध नाही, असा दावा केला. अनेक वर्षे मी पुण्याचा पालकमंत्री मी होतो. पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या काही आढावा बैठका घ्यायच्या असतात. Ajit Pawar
एका रिटायर्ड आयपीएस अधिकाऱ्यांनी एक पुस्तक लिहिलं त्यानुसार मीडियात बातम्या आल्या की अजित पवार अडचणीत त्यांच्यावर कारवाई करा. पण मी यात काहीही केलं नाही. असे अजित पवार म्हणाले आहे.
यावेळी अजित पवारांनी २००८ साली सरकारने काढलेला एक जीआर सादर केला. संबंधित प्रस्ताव गृह विभागाचा होता, त्याच्याशी माझा काय संबध? त्यावेळी गृहमंत्री आर आर पाटील होते. मी आणि माझे काम, असा माझा स्वभाव आहे.
रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांशी माझा काही संबंध नाही. गेल्या तीन चार दिवसांपासून माझ्याविरोधात बातम्या येत आहेत. मी त्याला महत्त्व दिले नाही.
मी अनेकवर्षे पालकमंत्री होतो, कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या कोणत्याही गोष्टी कधीही केल्या नाहीत. एखाद्याचे काम होत नसेल, तर मी त्याला तोंडावर नाही होत म्हणून सांगतो, पण चुकीचे काही काम करत नाही, अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी केली.