Ajit Pawar : महेश गायकवाडकडेही पिस्तुल होतं, पण त्याला…!! गणपत गायकवाड फायरिंग प्रकरणात अजित पवारांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबारप्रकरणात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केले. या फायरिंगमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक जिल्हाप्रमुख महेश गायकवाड जखमी झाले. मात्र, या गोळीबारावेळी महेश गायकवाड यांच्याकडेही रिव्हॉल्वर होते. या झटापटीत त्यांना ते बाहेर काढता आले नाही, या अजित पवार यांच्या गौप्यस्फोटांमुळे खळबळ उडाली आहे.

मात्र या गोळीबारावेळी महेश गायकवाड यांच्याकडेही रिव्हॉल्वर होते, त्या सगळ्या झटापटीत त्यांना ते बाहेर काढता आले नाही, असे अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. अजित पवारांनी आज पुणे विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हाने केलेला गोळीबार यासह अनेक प्रश्न विचारण्यात आले.

या गोळीबाराच्या आवाजानंतर पोलीस आले, पोलिसांनी तिथे ते कंट्रोल केलं, म्हणजे थांबवलं, त्यांना पकडलं आणि त्याच्यातून जो जखमी होता त्याला ताबडतोब हॉस्पिटलला नेलं. आता तो आऊट ऑफ डेंजर आहे. त्याची माहिती पण आम्ही रोजचे रोज घेतोय. आता पूर्णपणे तो त्याच्यातून बाहेर निघालेला आहे, असं अजित पवार यांनी सांगितले. Ajit Pawar
दुसरी गोष्ट म्हणजे जे काही बाकीचे लोक होते, सत्ताधारी पार्टीचा आमदार वगैरे असा कुठलाही विचार न करता त्यांना पण अरेस्ट केलेली आहे आणि पोलिसांची पुढची कारवाई चालू आहे, असं अजित पवार म्हणाले.
