मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, शरद पवारांना मोठा धक्का…
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज मोठा राजकीय भुकंप झाला त्याची वेगळी परिणीती समोर आली आहे. अखेर राज्याचे नवे उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना शपथ दिली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपण गेम चेंजर्स असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकावत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात सुरु होती. दादांनी पुन्हा मोठा राजकीय भुकंप केल्याचे दिसून आले असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह आणखी काही आमदार शपथविधी घेतली आहे. विशेष म्हणजे काही वेळेपूर्वी शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली होती. त्यात त्यांनी आपल्याला अजित पवारांच्या बैठकीविषयी काहीच माहिती नसल्याचे म्हटले होते.